Sand Castle

Shyam had built a beautiful sand castle. He carefully took out some sand to form the main gate entrance. Few granules of sand remained stuck to his fingers; he enjoyed the moisture and the smooth texture. As a final touch, he mounted a tiny flag on the top of one of the towers. Shyam looked at his creation with pride and admiration. Suman, his younger sister, ran to see the castle. Father stood a little distance away watching the kids immersed in their innocent games.

A tiny bubbly wave gradually came near the castle almost touching its base. Then came another one which was a little stronger, but the castle stood its place. Shyam was glad for having built a Sea Fort. His smile vanished soon though. Fierce waves followed taking his castle down part by part each time. The kids were dismayed. Helpless and with teary eyes, both ran to father. He embraced them and listened patiently although he had already seen it.

“Shyam, you enjoyed building the castle, didn’t you?” Father asked. “Did you have any control on the waves, no, right? We can come back tomorrow, and you can rebuild the castle once again, can’t you?” “But I had taken so much effort…” Shyam complained. “And I waited patiently for so long until it got ready,” Suman interrupted Shyam. Both were obviously much disappointed.

Father smiled and continued, “Alright kids, first of all, I know that you are upset. But I want you to remember three things. First, that we can always mend things or even start over from scratch if we have the will to do so. Secondly, any structure needs a sound foundation deep enough to stand strong above the ground. And, finally, that our happiness should not depend upon things beyond our control. We must learn to let go.”

“So, my dear, these are the three golden rules that my father taught me about four decades ago.” Shyam told his son. The memory was as fresh in his mind as if it had occurred the day before. He could still feel father’s pat on his back as he stood watching his son build a Sand Castle on the same beach where he and Suman used to go with father. Shyam sat on his knees and took some sand. Every year the smooth moist sand emanated a warmth that left him with a longing to return once more …

टेलिस्कोप

चिनू आज्जीचं बोट धरून शाळेतून घरी निघाली. तिनं पाहिलं की एरव्ही तिच्यापेक्षा उंच दिसणारी सावली आज ठेंगणी दिसत होती. चिनूनं ही गंमत दाखवली तेव्हा आज्जीला आठवलं की घरुन निघताना गडबडीत छत्री घ्यायचीच राहिली. एरव्ही शाळा सुटेपर्यंत ऊन उतरत आलेलं असे. आज्जीनं पदराने चिनूचं डोकं झाकलं. “अगं नको, गुदगुली होतीये मला, कित्ती मऊ आहे गं आज्जी तुझी साडी.” म्हणत चिनू गोड हसली. आज्जीने मनोमन तिच्या लाडोबाची दृष्ट काढली. रमत गमत चालणारी स्वारी घर जवळ येताच आज्जीचं बोट सोडून पळाली, पण दाराजवळ येताच थोडी थबकली. कोणीतरी पाहुणे आलेत असं दारा बाहेरचे चप्पल -बुट बघुन तिने ओळखले. एव्हाना आज्जी पण पोहोचली. “अगं, बाहेर का थांबलीस? कोण आलेत ते आत जाऊनच कळेल की नाही? चला,” असं म्हणत आज्जी चिनूला घेऊन घरात आली.

“आजोबा, मी आले. उद्या सुट्टी. येsss.” चिनूला मांडीवर घेत आजोबा म्हणाले, “वा मज्जा आहे बुवा मग! बरं हे पाहिलंस का कोण आलंय तुला भेटायला? त्यांना नमस्कार करा पाहू.” चिनू नमस्कारासाठी धावली पण तिला वर उचलून सुलभाने जवळ घेतले आणि गालावर एक पापी दिली. सुधीरने चिनुच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला आणि एक मोठ्ठे चॉकलेट तिच्या हातात दिलं. “मावशी, चिनू खूप शहाणी झालीये बरं का. मागच्या वेळी काय गिफ्ट आणू विचारलं तर मला काही नको म्हणाली पण तुझ्यासाठी काहीतरी आणायला सांगितलं तिनं.” सुधीर चिनूला टाळी देत आज्जीला म्हणाला. खरं तर तो आज्जीच्या मैत्रीणीचा मुलगा, पण सुधीर आणि सुलभा म्हणजे अगदी सख्खा भाचा आणि सून असल्याप्रमाणे आज्जी-आजोबांशी प्रेमाने वागत.

थोड्या गप्पा झाल्यावर चिनू आज्जीला गिफ्ट देण्यासाठी सुधीरकाकाला खुणावू लागली. आज्जीने गिफ्ट उघडायला चिनूकडेच दिले. “अरे वा, किती सुंदर आहे हा पहा आज्जी,” म्हणत चिनूने अवकाश निरीक्षक वापरतात तसा टेलिस्कोप आज्जीकडे दिला. आता हे मला कशासाठी अशी आज्जीची प्रश्नार्थक मुद्रा बघून चिनू स्वतःहूनच म्हणाली, “अगं मी शिकवीन तुला त्याचा उपयोग. आम्हाला शाळेत शिकवलंय हे कसं वापरायचं ते. अगं, आपण आता उन्हाळ्यात गच्चीवर नाही का झोपणार? मग तू मला आई-पप्पा जिथे राहतात ते तारे दाखवतेस बघ. पण मला शोधायला वेळ लागतो तर तुझे डोळे दुखतात ना खूप वेळ दूर बघून. मग त्यामुळे तुझ्या डोळ्यातून पाणी पण येते. आता टेलीस्कोपने एकदम सोप्प होईल शोधणं.” काही क्षण सारे शांत होते, मग सुधीर स्वतःला सावरून म्हणाला, “अरे हो, खरंच की. मावशी तुला म्हणालो नव्हतो की चिनू खूप हुशार झालीये.” सुलभाने आज्जीला पाणी दिले आणि पाठीवर हात ठेवत म्हणाली, “चला सगळ्यांना भूक लागायच्या आत आम्ही स्वयंपाक करून घेतो, चिनू तोपर्यंत तू, सुधीरकाका, आणि आजोबा कॅरम खेळा हं.”

रात्री अंथरुणं घातल्यावर थोडा वेळ सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले. आज्जीच्या तोंडून शंभर वेळा ऐकली असली तरीही चिनुने हट्टाने धृवबाळाचीच गोष्ट सांगायला लावली. गोष्टीतल्या राजपुत्राचा धृवतारा झाला तोवर चिनू आज्जीच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ झोपली. चिनूला अलगद उचलून सुधीरनं आज्जी-आजोबांच्या बेडवर नेऊन ठेवलं. सुलभा तिच्या उशाशी थोडावेळ थांबली. चिनुच्या गालावर एक नाजूकसं स्मित होतं. दिवसभर टेलीस्कोपच्या आनंदात होती. ती शांत झोपल्याची खात्री करून सुलभा हॉलमध्ये आली. चौघे थोडावेळ निःशब्दपणे एकमेकांकडे पाहत आणि परत विचारात गढून जात होते. शेवटी आज्जीच बोलली, “मी ठीक आहे सुधीर. तू वाईट वाटून घेऊ नकोस. चिनू आनंदी झाली ना, आपल्याला तेवढंच पुरे. उलट तुम्ही दोघे सारं इतक्या आपुलकीनं करता नेहमीच.”

सुलभाने सुधीरकडे डोळ्यांनी मुकपणे तूच बोलतोस का अशी विनवणी केली. “मावशी, मी आणि सुलभा एक विचारू म्हणत होतो गेले काही दिवस. नाही म्हणजे आम्हाला इतक्या वर्षांत पालक व्हायचं भाग्य नाही लाभलं हे खरंय. पण एक बाबा नी आई जी माया मुलांना देऊ शकतात ती देण्याचा प्रयत्न मात्र नक्की करू शकतो आम्ही. मनापासून वाटलं म्हणून बोललो. चिनू खूप लाघवी बाळ आहे ना!” त्याहून जास्त सुधीरला बोलवेना, तेव्हा सुलभा म्हणाली, “चला आता सारे झोपुया. सकाळी बोलू. मावशी, काकांना पण आराम करू देत.”

बेडवर चिनू शेजारी आज्जी आजोबा पडले खरे पण दोघांना आज झोप येईना. आज्जी चिनुला हळुवार थोपटत होती. आजोबा शांतपणे खिडकीतून दिसणारं आकाश न्याहाळत होते. त्यांनी आज्जीला आकाशाकडे बोट करून खुणावलं. आपल्या अढळ स्थानावरून तेजस्वी धृवतारा जणू सांगत होता, प्रत्येकाला त्याच्या हक्काचं प्रेम हे मिळणारच. चांदण्याच्या प्रकाशात उशाशी ठेवलेला टेलीस्कोप मध्येच लकाकत होता. खरंच त्याच्या निमित्ताने आज्जीला चिनूच्या भावी आयुष्यातील अखंड सुखाची ग्वाहीच मिळाली होती. “आज्जी, आता तुझे डोळे दुखणार नाहीत बघ,” गाढ झोपेत बडबडत चिनू कूस बदलून तिला बिलगली.